Friday, July 31, 2020

नवं शैक्षणिक धोरण : मराठीतून शिक्षणाविषयी नेमकं काय धोरण आहे?


नवं शैक्षणिक धोरण : मराठीतून शिक्षणाविषयी नेमकं काय धोरण आहे?
दीपाली जगताप
बीबीसी मराठी
30 जुलै 2020

देशातील सर्व शिक्षण सस्थांमध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. या धोरणामध्ये शालेय शिक्षण पद्धती बदलण्यात आली आहे. यातील सर्वांत मोठा बदल म्हणजे पाचवीपर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून देण्यात यावे अशी सूचना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आली आहे.

देशभरातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आता मातृभाषेतून कसं शिकवायचं? पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिकवण्याची सक्ती धोरणात करण्यात आली आहे का? पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण इंग्रजीतून कसं करायचं? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.

मातृभाषेतून शिक्षण घेण्याबाबत नवीन शैक्षणिक धोरणात काय म्हटलं आहे?

बुधवारी (29 जुलै 2020) नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. पूर्व प्राथमिक ते पदवी शिक्षणापर्यंतची भविष्यातली शिक्षण प्रणाली कशी असेल याबाबत केंद्र सरकारने धोरण निश्चित केलंय.

59 पानांच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाचवीपर्यंतचं शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत देण्यात यावं असं या धोरणामध्ये म्हटलं आहे.

या नियमाची सक्ती असेल असं धोरणात स्पष्ट केलेलं नाही. शैक्षणिक धोरणाच्या अहवालात 12 व्या पानावर 4.9 या क्रमांकाच्या मुद्यात नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूया.


मातृभाषेतून शिकवा असं सांगताना धोरणात 'wherever possible' म्हणजेच 'शक्य आहे तिथं' असा शब्द प्रयोग वापरण्यात आला आहे.

मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास शालेय शिक्षणातील मूळ संकल्पनांचे आकलन लहान मुलांना लवकर होतं हे सर्वमान्य आहे.

शक्य आहे तिथं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिकवा. आठवी आणि त्यापुढील शिक्षणही मातृभाषेतून देणं योग्य ठरेल. यासाठी घरी बोलली जाणारी भाषा किंवा मातृभाषा किंवा स्थानिक भाषा हे तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे या भाषांमधून शिक्षण द्यावं, असं सांगण्यात आलं आहे.

खासगी आणि सरकारी दोन्ही शाळांसाठी धोरणातील हा मुद्दा लागू आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मातृभाषा आणि स्थानिक भाषेतली गुणवत्तापूर्ण पुस्तकं विज्ञान विषयासहित उपलब्ध करून देण्यात येतील. मातृभाषेतील पुस्तकं उपलब्ध नसल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकवताना होणारा संवाद जिथे शक्य असेल तिथे मातृभाषेतून करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या विद्यार्थ्याची शालेय माध्यमाची भाषा ही मातृभाषेपेक्षा वेगळी आहे तिथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना द्विभाषिक दृष्टिकोन ठेवावा, असंही सूचवण्यात आलंय.

यामुळे आता विविध भाषांमधल्या शिक्षकांना नोकरी देण्यासाठी विविध राज्यांमध्ये शिक्षकांसोबत शैक्षणिक भाषा शिकवण्याबाबत करारही होऊ शकतात.

जे विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेत आहेत त्यांना सहावीपासून विज्ञान आणि गणित दोन भाषांमध्ये शिकवण्यात येईल. यामुळे नववी इयत्तेपर्यंत विद्यार्थी विज्ञान आणि इतर विषयांविषयी मातृभाषा आणि इंग्रजी भाषेतून बोलू शकेल.


याचा अर्थ काय?
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षणाविषयी 'शक्य असेल तिथे' असा शब्द प्रयोग वापरल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्येही गोंधळ उडाला आहे.

राज्य शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांना या प्रशासकीय भाषेचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "याचा स्पष्ट अर्थ म्हणजे ज्या पालकांना आपल्या पाल्याने मातृभाषेतून शिक्षण घ्यावं असं वाटतं त्यांच्यासाठी द्विभाषिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत."

"शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेत शिक्षणाची सक्ती अथवा बंधनकारक अथवा अनिवार्य असा कोणताही शब्द वापरण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याला सक्ती असं म्हणता येणार नाही. ही सर्व प्रक्रिया ऐच्छिक स्वरुपाची आहे. ज्या शाळांना मातृभाषा आणि इंग्रजी भाषा या दोन्ही सांगड घालून शिकवायचे असल्यास त्यांना संधी आहे."


महाराष्ट्रात मराठी शाळांमध्ये शिकवत असताना केवळ मराठी भाषाच वापरली जाते. पण इंग्रजीच्या सर्वच शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला संवाद दोन्ही भाषांमध्ये होतोच असं नाही.

ज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा पर्याय आहे तिथे मात्र इंग्रजी आणि मातृभाषा असं शिक्षणाचं द्विभाषिक सूत्र अवलंबण्यात येतं.

"मातृभाषेची सक्ती करून मुलांमध्ये भाषेचं प्रेम निर्माण करता येत नाही. त्यासाठी जनभावना रुजवावी लागते. समाजात असे बदल कायद्याने होत नाहीत," असंही मत काळपांडे यांनी व्यक्त केलं.

शिक्षण हक्क कायद्यामध्येही 'as far as possible' म्हणजेच शक्य तेवढे शिक्षण मातृभाषेत देण्यात यावं असं म्हटलं होतं. 2013 मध्ये शिक्षण हक्क कायद्यची अंमलबजावणी देशभरात करण्यात आली. पण कुठेही मातृभाषेची सक्ती करण्यात आलेली नाही.

सरकारला जर प्रत्यक्षात मातृभाषेची सक्ती करायची होती तर धोरणात स्पष्ट उल्लेख का केला नाही, असाही प्रश्न शिक्षण क्षेत्रातून विचारला जातोय.

"यामागे शिक्षणाचं सांस्कृतिक राजकारण आहे. शिक्षण हक्क कायद्यानंतर केंद्र सरकारला नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेसाठी ठोस पावलं उचलण्याची संधी होती. पण सरकारने केवळ पर्याय उपलब्ध करून ही संधी गमावली," असं मत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि भाषातज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केलं आहे.


मातृभाषेतून शिक्षणाची सक्ती घटनाबाह्य?
2014 साली कर्नाटक सरकार विरोधात अशाच पद्धतीनं भाषेची सक्ती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत घटनापीठ निकाल देईल असं सांगितलं होतं.

मुलांनी कोणत्या भाषेतून शिक्षण घ्यायचं हा सर्वस्वी त्यांच्या पालकांचा निर्णय आहे, असा निकाल 6 मे 2014 रोजी घटनापीठाकडून देण्यात आला. या प्रकरणात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही, असंही न्यायालयानं त्यावेळी स्पष्ट केलं.

"या धोरणामध्ये जर सक्तीची भाषा वापरली असती तर ती घटनाबाह्य ठरली असती," असं मत वसंत काळपांडे यांनी व्यक्त केलं आहे.

भारतीय संविधानात भाषा स्वातंत्र्याला महत्त्व देण्यात आले आहे. जगभरातही भाषा स्वातंत्र्य मान्य करण्यात आले आहे.

"पण कोणतंही सरकार मुलांवर किंवा कुणावरही कोणत्या भाषेतून शिकावं, बोलावं याची सक्ती करू शकत नाही. जर अशी सक्ती केली तर ती घटनाबाह्य ठरेल," असं वकील असीम सरोदे यांचं म्हणणं आहे.

भाषा स्वातंत्र्य हे प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातही मोडतं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातही विविध भाषांचे पर्याय शिक्षणासाठी उपलब्ध करत विद्यार्थ्यांना भाषा निवडीचं स्वातंत्र्य देण्यात येतं.


मातृभाषेतले शिक्षण का महत्त्वाचं?
वयोगट 3 ते 11 मध्ये मुलांनी जर मातृभाषेत शिक्षण घेतलं तर ते अधिक लवकर शिकतील असा निष्कर्ष विविध सर्वेक्षणातून मांडण्यात येतो. याचाच दाखला नवीन शैक्षणिक कायद्यातही देण्यात आलेला आहे.

शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी मुलं आपल्या घरी बोलली जाणारी भाषा शिकतात. शाळेत गेल्यावर शिक्षणाचं माध्यम बदलल्यानंतर मुलांना अनोळखी भाषा पुन्हा शिकावी लागते.

मराठी शाळांसाठी चळवळ उभी करणाऱ्या आणि लेखिका शुभदा चौकर यांनी सांगितले, "शाळेत मुलांना माहिती मिळत असते पण त्याचं ज्ञानात रुपांतर करण्याची प्रक्रिया प्रत्येक मुलाची वेगळी असते. ही प्रक्रिया घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून झाली तर मुलांना त्याचं ज्ञानात रूपांतर सहज करता येतं."

उदाहरण देताना शुभदा चौकर म्हणतात, "विद्यार्थ्याला जलचक्र शिकवत असताना वॉट रम्हणजे पाणी हे विद्यार्थ्याला शिकावं लागत असेल तर जलचक्र शिकणं त्याच्यासाठी सहज सोपं नसतं."

वकिली क्षेत्रातही मातृभाषेतून बाजू मांडण्याची संधी मिळाल्यास वकील ठोस बाजू मांडू शकतात, असं वकील असीम सरोदे सांगतात. ते म्हणतात, "महाराष्ट्रात मराठी वकील आहेत त्यांना जर मराठी भाषेतून वकीली करण्याची परवानगी मिळाली तर ते सर्वोच्च न्यायालयातही उत्तम बाजू मांडू शकतात."

Friday, June 19, 2020

नवोदय यश

आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि, *जि प प्रा शा कासारी (बो.)  केंद्र - देवदहिफळ ता.धारूर जि.बीड*  या शाळेने *नवोदय* परीक्षेतील *यशाची परंपरा* कायम राखली आहे यावर्षी सुद्धा *एक विद्यार्थी नवोदय साठी पात्र ठरला आहे*

यानिमित्ताने कासारीच्या जि.प.शाळेने हॅट्रिक पूर्ण केली आहे *सलग 3 वर्ष एक- एक विद्यार्थी नवोदय साठी पात्र* ठरले आहेत.


कासारीच्या सर्व शिक्षकांनी केलेला प्रयत्न व मु.अ.यांची योग्य साथ यामुळे हे यश मिळवता आले.


*चि.वैभव बळीराम बडे याचे* व त्याच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याच्या पालकांनी त्याला शिकवले व त्याने देखील कसून प्रयत्न केले.


   *आपली शाळा*

*जि.प.कासारी शाळा*

Monday, June 8, 2020

हीच वेळ आहे शैक्षणिक वर्ष बदलण्याची. (दै.सकाळ)

हीच वेळ आहे शैक्षणिक वर्ष बदलण्याची.

1) आत्ताच संधी आली आहे. सध्या जरा थांबा आणि पुढले शैक्षणिक वर्ष 2021 च्या जानेवारीत सुरू करा. जानेवारी ते डिसेंबर असेच शैक्षणिक वर्ष कायमस्वरूपी करा. आता हातात मिळालेले जुलै ते सप्टेंबर हे महिने नवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास आणि त्यांच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात घालवा. चालू शैक्षणिक वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये घ्या. डिसेंबरात निकाल आणि जानेवारीपासून शालेय आणि महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करा.
2) सहा महिने फुकट जातील, असा यावर आक्षेप येऊ शकतो. पण ते तसे जाऊ द्या. फक्त एक डिग्रीचा कागद देण्यासाठी एवढी घाई कशाला? नाहीतरी लगेच नोकरी मिळण्याची शाश्वती आहे का? उलट परीक्षा देऊन अथवा न देता पास झालेली मुले (काही थोडी पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज भरतील ती सोडून) जुलैपासून पुढे पदवीधर बेरोजगारांच्या यादीत ढकलली जातील. त्यांचे 'विद्यार्थी' हे स्टेटस बदलून 'पदवीधारक' असे होईल. परंतु देशात आर्थिक स्थिती डळमळीत असताना नोकऱ्या मिळणार कशा? त्यापेक्षा थोडा संयम राखून अजून चार महिन्यांनी परीक्षा घेतली तर बिघडले कुठे?
3) महाविद्यालयीन शिक्षणात कित्येक त्रुटी आहेत. अनेक विद्यापीठांना आपली मूल्यांकन पद्धत, अध्यापन पद्धत यात मूलभूत बदल घडवायचे आहेत. सध्याच्या संधीचा फायदा घेऊन यावर मंथन व्हावे. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हा अवधी आहे. मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर व सीनियर कॉलेजांनी वर्ग चालू करावे. करिअर संबंधात मार्गदर्शन करावे. त्यांना नुसतेच ' ओपन जॉब मार्केट'मध्ये ढकलून कोणाचा फायदा होणार? उलटपक्षी 2020मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेसंबंधातच प्रश्न उपस्थित केले जातील, त्यांना हास्यास्पद ठरवले जाईल. आपल्याला कसेबसे पास झालेले विद्यार्थी हवेत की नव्या दमाने, नव्या उमेदीने तयार झालेले विद्यार्थी हवेत?
4) जी परिस्थिती महाविद्यालयांची, तीच शाळांची. घाईघाईने शाळा सुरू करून, नऊ महिन्यांचा अभ्यासक्रम सात महिन्यांत कोंबून फेब्रुवारीत शालान्त परीक्षा घेण्याचा आटापिटा का? लॉकडाउनच्या काळात, कठीण आर्थिक स्थितीला सामोरे जाणारी, सैरभैर झालेली मुले अभ्यासाचा ताण सहन करू शकतील का? प्राथमिक शाळांतली मुले एकाग्र होऊ शकतील का? कित्येक मुले तर फी देण्याच्या क्षमतेअभावी शाळेपर्यंत पोचतील की नाही हीही शंका आहे. त्यापेक्षा निम्न आर्थिक स्तरातल्या पालकांना आधी स्वतःच्या जीवनात स्थिरस्थावर होऊ द्या.
5) मुळात जून ते एप्रिल हे शैक्षणिक वर्ष ठरवले कुणी तर भारतातला मे महिन्यातला उन्हाळा सहन न होणाऱ्या ब्रिटिशांनी. (शिक्षण पद्धतीही अजूनपर्यंत त्यांच्याच जुनाट पद्धतीवर आधारलेली आहे.)जूनमध्ये शाळांबरोबरच पाऊस सुरू होतो, शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे ग्रामीण भागात मुले शाळेत येऊ शकत नाहीत. मी स्वतः ज्या आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य बनवते त्या मुलांच्या शाळांचे निरीक्षण केले तेव्हा असे आढळले की वर्गखोल्या चिप्प ओल्या, शिक्षण साहित्य भिजलेले, लहान वयाचे विद्यार्थी आजारी अशा 'बेहाल' परिस्थितीत जून ते ऑगस्ट हा काळ जातो. त्यानंतर सणांची आणि उत्सवांची रांग लागते. मग दिवाळीची दीर्घ सुट्टी. असे ब्रेक घेत घेतच शैक्षणिक वर्ष पुढे सरकते. त्यात प्रत्यक्ष अध्यापनाचे दिवस व तास किती घेतले जातात?
6) जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले तर एप्रिलपर्यंतच्या काळात फारसे सण नसल्याने अध्यापनात सलगता मिळेल. विद्यार्थी आणि शिक्षक अधिक उत्साही असतील. जून जुलै महिन्यात पावसाच्या/ नैसर्गिक आपत्तीच्या काळात (स्थानिक हवामानानुसार/ सणांनुसार) सुट्टी देता येईल. दिवाळी वगैरेंच्या निमित्ताने एक आठवडा सुट्टी देता येईल. त्यानंतर क्रीडा/ सांस्कृतिक उपक्रम घेऊन वर्षअखेरीला म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेता येतील. हे अमलात आणायला सोपे, सुटसुटीत नाही का? देशात अनेक शहरांत वेगवेगळे शैक्षणिक वर्ष असते. कित्येक वेळा कोणते बोर्ड आहे, त्यावरही वर्ष ठरते. मुंबईतल्या काही प्रतिष्ठित शाळांचे वेळापत्रक इतके विचित्र आहे.. फेब्रुवारीत परीक्षा, नंतर मार्चचे पहिले दोन आठवडे सुट्टी, त्यानंतर लगेच नवे शैक्षणिक वर्ष सुरू, पुन्हा एक मेपासून महिनाभर सुट्टी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शाळा सुरू. यात सलगता कुठे आली?...अशा वेळी सुसूत्रता आणण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष योग्य ठरेल.
संपूर्ण विद्यार्थी जीवनात चार सहा महिने म्हणजे काहीच नाही. आतापासून योग्य नियोजन केले तर पुढे चांगले फळ मिळेल. तेव्हा शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्यांनी, नवे काही उभारू इच्छिणाऱ्यांनी वर्ष रचना बदलण्याची मागणी लावून धरली पाहिजे.
थोडे थांबून विचार करा. आता संधी आहे.
बेरोजगारांची संख्या वाढवण्याची घाई नको.
सध्याचे शैक्षणिक वर्ष ब्रिटिशांच्या सोयीनुसार ठरवले गेले.
भारताच्या परिस्थितीला जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष जास्त उपयुक्त.
(लेखिका आदिवासीबहुल भागात मुलांसाठी प्राथमिक अभ्यासक्रमाची आखणी आणि शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणाऱ्या गटासोबत काम करतात.)

Saturday, May 30, 2020

संतांची अंधश्रद्धा व विषमतेवरील रचना

सामाजिक असमता, अंधश्रद्धा, भोंदूगिरीविरोधात साडेसातशे वर्षापूर्वी वारकरी संतांनी पहिली आरोळी पंढरपूरच्या वाळवंटात ठोकली. नामदेव, ज्ञानदेव ते वारकरी सांप्रदायाचे कळस म्हणून ओळखल्या गेलेल्या तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार जागरण केले. देवाच्या, धर्माच्या नावाने, कर्मकांडाच्या निमित्ताने समाजाचे शोषण करणा-यांच्या विरोधात वारकरी संतांनी अक्षश: कोरडे ओढले आहेत. त्यांनी केलेल्या समाजमनाच्या मशागतीमुळेच महाराष्ट्रात सुधारणावादी विचारांची पेरणी झाली.


  महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा भक्कम वारसा असून तो अधिक मजबूत करण्यात वारकरी संतांचे योगदान मोठे आहे. किंबहुना ज्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या दलदलीत रुतून बसला होता, त्याच काळात वारकरी चवळवळीने अधिक आक्रमक होत त्याच्याविरोधात जागरण केले. सामाजिक समता आणि अंधश्रद्धामुक्त समाज हेच वारकरी सांप्रदायाचे मूळ उद्दिष्ट आहे. अंधश्रद्धेच्या आधीन गेलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी ज्ञानोबापासून तुकोबापर्यंत आणि जनाबाईपासून बहिनाबाईपर्यंत सर्वानीच प्रयत्न केले.


ज्ञानेश्वर, नामदेव यांची भाषा काही सौम्य असली तरी तुकोबा मात्र अत्यंत परखड आणि थेट भाषेत समाजातील भोंदुगिरीवर कोरडे ओढतात. आपण देवाचा अवतार आहोत किंवा साधू आहोत. दैवी शक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे, असे सांगत स्त्रियांचे शोषण करणा-या आसाराम बापूंसारख्या ढोंग्यावर तुकाराम महाराजांनी किती कठोर शब्दात प्रहार केले, हे वारकरी म्हणून घेणा-या प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात-


अंगा लावूनिया राख। 

डोळे झाकूनी करिता पाप। 

दावोनी वैराग्याची कळा। 

विषय भोगिती सोहळा।


आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात-


तुका म्हणजे ऐशा नरा। 

मोजोनी मारावे पैंजरा॥


जातीभेद आणि कर्मकांडाच्या अंधारात चाचपडणा-या समाजाला जागृत करण्यासाठी वारकरी संतांनी केलेले प्रयत्न फार मोलाचे आहेत. नामदेव, ज्ञानदेव ते तुकाराम महाराजांपर्यंत प्रत्येक संतांनी समाजातली अंधश्रद्धा आणि वर्णव्यवस्थेवर कोरडे ओढल्याचे दिसून केले. अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच सामाजिक समता निर्माण करण्यासाठी वारकरी संतांनी केलेले प्रयत्न फार मोलाचे आहेत. किंबहुना वर्णव्यवस्थेचे चटके बसलेल्या सुधारणावादी विचारवंतांनीच पुढे येऊन ही चळवळ सुरू केली असे म्हणावे लागेल.


अर्थात, त्यावेळच्या व्यवस्थेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवीत असतानाही त्यांच्या भाषेत आक्रोष नव्हता, तर विनयशीलता होती. हजारो वर्षाच्या जातीभेदाच्या भिंती धडाधड पाडून टाकीत असताना त्यांनी कुठे क्रांतीची भाषा केली नाही.


सामाजिक विषमतेच्या आजारावर उपचार करीत असताना त्यांनी वरून मलमपट्टी केली नाही. अंतरंगात शिरून बदलाची प्रक्रिया सुरू केली. पोटात घेतलेले औषध जसे शरीरावरची जखम बरी करते, तसाच वारकरी संतांच्या विचाराने समाज आतून बदलत गेला आणि समाजातील उच्च-नीचतेच्या भिंती ढासळत गेल्या. पंढरीची वारी त्या विचाराचे विराट रूप आहे.


परकीय आक्रमकांनी भारतावर जवळपास कब्जा मिळविलेला होता, त्याच वेळी स्थानिक सर्व समाज मात्र कर्मकांडात अडकला होता. जातीभेद आणि उच्च-नीचतेच्या भोव-यात अडकलेला होता. उच्चवर्णीयांची अरेरावी आणि आक्रमकांची दादागिरी यात समाज भरडला जात होता. तेव्हा समाजाला कर्मकांडाच्या कचाटयातून सोडवत असतानाच जातीभेदांना गाढून सर्वाना एका व्यासपीठावर आणण्याचे काम संत नामदेवांनी केले. परिसा भागतांसारख्या ब्राह्मणापासून ते समाजातल्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या चोखोबांपर्यंत सर्वाना एका व्यासपीठावर आणण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी त्यांना घणघोर संघर्ष करावा लागला असेल. त्याच्या पाऊलखुणा वारकरी संतांच्या अभंग रचनेत पाहायला मिळतात.


सामाजिक विषमतेचे चटके नामदेवांनाही मोठया प्रमाणात बसले असल्याचे त्यांच्या काही रचनांमधून दिसून येते. शिंप्याच्या कुळात जन्म घातल्यामुळे आपल्याला सामाजिक विषमतेचे चटके सोसावे लागतात ही तक्रार थेट देवाकडेच करताना नामदेव म्हणतात-


हिनदिन जात मोरी पंढरीचे के राया। 

ऐसा नामा दर्जी तुने काहेको बनाया॥


त्यांच्या या रचनेवरूनच जातीव्यवस्थेच्या आगीत ते चांगलेच होरपळलेले दिसून येतात. ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई या भावंडांनाही समाजात बहिष्कृत केल्याने प्रचंड मनस्ताप सोसावा लागला होता. म्हणूनच ज्ञानेश्वर आणि नामदेव या दोघांनी पुढाकार घेत त्यावेळच्या समाजातील सर्व स्थरातील विचार करणा-या लोकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातूनच वारकरी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हणावे लागेल. त्यापूर्वी वारकरी नव्हते असे नाही. त्यापूर्वी वारकरीही होते आणि पंढरीची वारीही होती. मात्र नामदेव-ज्ञानदेव यांनी त्याचे चळवळीत रूपांतर केले.


सामाजिक विषमतेची दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळच्या सर्व समाज घटकातील जे जाणते लोक होते त्यांना केवळ एकत्र आणले नाही, तर त्यांना व्यक्त होण्यासाठी लिहिते केले. त्याची सुरुवात त्यांनी आपापल्या घरातूनच केली. त्यासाठी नामदेवांनी अभंग हा काव्य प्रकार शोधून काढला. ज्ञानेश्वरांची सर्व भावंडे लिहिणारे-वाचणारे होते.


नामदेवाच्या भेटीपूर्वीच ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका अर्थात, ज्ञानेश्वरी लिहिली होती. मात्र या दोघांची भेट झाल्यानंतर ज्ञानदेवांनी लोकांना कळेल अशा सोप्या भाषेत अभंग रचना सुरू केली. नामदेवांच्या घरातील लोक शिक्षित असतील असे गृहीत धरले तरी जनाबाईला मात्र खास लिहिते केले असावे असे वाटते.


नामदेवांच्या घरामध्ये एकूण चौदा सदस्य असल्याचा उल्लेख जनाबाईच्या अभंगातून पाहायला मिळतो. त्या सर्वाच्या नावाने काही अभंग आहेत. त्यांच्या घरात दासीचे काम करणा-या जनाबाईचे अभंग तर नामदेवांपेक्षाही अधिक बंडाची भाषा करतात.


याच काळात सामाजिक विषमतेचे चटके सोसलेले सावता माळी, सेना न्हावी, नरहरी सोनार, चोखामेळा हे सर्व जण एकत्र आले आणि त्यांनी आपल्या रचनेतून सामाजिक समतेची आरोळी देत असतानाच अंधश्रद्धा आणि कर्मकांडाविरोधात बंडाचे निशाण फडकविले. या संतांच्या बहुतेक रचनांमधून आपल्याला विषमतेचे चटके सोसलेले दिसतात. त्यातून त्यांची भाषा अधिक बंडखोर झाल्याची दिसते.


जनाबाई तर केवळ जातीव्यवस्थेतील असमानतेवर बोलत नाही, तर स्त्री म्हणून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबद्दलही नाराजी व्यक्त करते. तेवढे करून ती थांबत नाही, तर इतर स्त्रियांना प्रोत्साहन देताना स्त्रीचा देह मिळाला म्हणून उदास होऊ नका, असा आशावाद जागविताना म्हणते-


स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास। 

साधू संता ऐसे केले जनी॥


चोखाबांच्या पत्नी सोयराबाई यांची भाषाही खूप आक्रमक वाटते. वर्णव्यवस्थेच्या आगीत भाजलेली सोयराबाई थेट देवाला सवाल करते-


आमुची केली हिन जाती। 

तूज न कळे श्रीपती। 

जन्म गेला उष्टे खाता। 

लाज नाही तुझ्या चित्ता।


सामाजिक विषमतेबरोबरच कर्मकांड आणि समाजातील अंधश्रद्धांवरही वारकरी संतांनी जोरदार कोरडे ओढल्याचे दिसून येते. क्रियाकर्मासारखी थेरं करून कोण तरुण गेले आहे, असा सवाल करताना नामदेव महाराज म्हणतात-


थेर क्रियाकर्म। करिता हो केली। 

माजी कोण बळी। तरले सांगा?


क्रियाकर्मात अडकण्यापेक्षा वारकरी संतांनी कर्तव्याला अधिक महत्त्व दिल्याचे दिसते. म्हणूनच सावता महाराज आपल्या मळयात, भाजीतच विठोबाला पाहताना म्हणता-


कांदा मुळा भाजी। 

अवघी विठाबाई माझी। 

लसून मिरची कोंथिबीरी। 

अवघा झाला माझा हरी।


सर्वच वारकरी संतांनी समाजातील ढोंगावर, भोंदूगिरीवर प्रहार केले असले तरी तुकाराम महाराजांची भाषा अधिक आक्रमक असल्याचे दिसून येते. शेंदूर लावून देवपण दिलेल्यांच्या नादी लागून स्वत:चीच चेष्टा करून घेणा-या भोळया-भाबडया लोकांना सावध करताना तुकाराम महाराज म्हणतात-


शेंदरी हेंदरी दैवते। 

कोण ती पूजिता भूते केते। 

आपुल्या पोटाशी रडते। 

मागते शीते अवधान।


महाराज सांगतात अरे जे स्वत: उपाशी आहेत आणि तुमच्याकडे शिते मागतात ते तुम्हाला काय देणार आहेत. त्यामुळे अशांच्या नादी लागू नका. नवस सायास तर अजिबात करू नका, असे सांगताना महाराज अधिक स्पष्ट शब्दात सांगतात-


नवसे कन्या पुत्र होती। 

तरी का करणे लागे पती।


भगवे कपडे घालू, कीर्तन करून, पुराण सांगून कुणी साधू होत नाही, असे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात-


नव्हती ते संत करिता कीर्तन। 

सांगता पुराण नव्हती संत।


साधूची व्याख्या त्यांच्याइतकी अचूक फारच क्वचित कुणी केली असेल. महाराज म्हणतात-


जे का रंजले गांजले। 

त्याशी म्हणे जो आपुले। 

तोचि साधू ओळखावा। 

देव तेथेची जाणावा।


अशा भक्कम विचारांतून महाराष्ट्रात सुधारणांचे वारे वाहिले.वारकरी संतांनी केलेल्या वैचारिक मशागतीमुळेच महाराष्ट्रात सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री सक्षमीकरणाची चळवळ उभी राहील. हे कार्य अविरत सुरू आहे.

Wednesday, May 27, 2020

आता तरी विचार करा व बदला

*समाजाने आता बदललेच पाहिजे*

आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत ,त्यांचे ना *पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना ब्राम्हणांना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत ,पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत,* म्हणजे *संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा काही गोष्टी सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे...*


*Point to be noted*


१.  पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.*

२.   कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा.

३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा.

शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.

४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील.

६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा. 

७. मोडेल पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम)

8 आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल.

१०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच). स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवू ठेवा.

११. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू).

१२. नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका.

१३.   वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर अहेर देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी आजकाल कोणी घालत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय चालविणेही बंद करा.

१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायमच ऋणी रहा.

१५. घरातील महिलांना सन्मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्चशिक्षित करा.                      

१६.  मानवी इतिहासाची, विज्ञानाची, विचारवंतांची पुस्तके द्या.

१७. निंदा  टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि  असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका. 

१८. घराघरात जो मूर्ख TV चा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा, सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम TV करतोय, आपली सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट केला आहे या TV ने. 

१९. आपलं आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा, व स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा.

२०. चांगल्या गोष्टीना चांगले म्हणा, वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा, कायम सत्याच्या पाठीशी राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा,

२१. आपल्या कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करून जा, 

*हा संदेश आपल्या संपूर्ण समाजाच्या हिताचा आहे... तेव्हा स्वतःही स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा...*


*वाचन करा*

*व्यायाम करा*

*अर्थ साक्षर व्हा*

Tuesday, April 28, 2020

ब्लॉग निर्मिती- मुंडे सर

ब्लॉग कसा तयार करावा .
ब्लॉग तयार करण्याविषयी खालील सविस्तर कृतियुक्त माहिती .

1  ब्लॉग तयार करण्यास स्वत:चा  Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2  प्रथमतः www.blogger.com वर जा.
3  तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4  यानंतर New Blog ला click करा.
5  पुढे Blog चे title  व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g   ( bhimraomunde.blogspot.com]
6  त्याखालील हवे ते Template निवडा .
7  create blog ला click करा .
8 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9  आता new post वर click करा .
10  MSWord प्रमाणे Page open होईल .
11  तेथे आपली post तयार करा .
12 नंतर publish करा .
13  समोरील view blog करून आपली blog website पहा .
14  नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15  त्याखालील gadget वर क्लिक करा .
16  त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17  हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18  Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19  माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20  नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21  आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22  layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23  शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24  खाली तुम्हाला live blog दिसेल .
25   सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26  आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता


अधिक माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या
 https://bhimraomunde.blogspot.com/2020/04/blog-post.html?m=1

Google फॉर्म द्वारे Quiz निर्मिती

✒🌹✒


*गुगल फॉर्म च्या माध्यमातून क्विझ तयार करणे*


१. सर्वप्रथम क्रोम ब्राऊझर वर जाऊन Google forms टाईप करावे.


२. गुगल फॉर्म ओपन होईल , go to Google form त्यावर जाऊन + या ऑप्शन वरून नवीन गुगल फॉर्म ओपन करावा.


३. गुगल फॉर्मवर क्विझ तयार करावयाची असल्यामुळे फार्म ओपन होताच फॉर्मच्या सेटिंग मध्ये जावे तेथे 3 विंडो असतील . त्यामध्ये पहिली जनरल , दुसरी प्रेझेंटेशन आणि तिसरी क्विझची असेल. क्विझ वर क्लिक करा .


४. Make this quiz हे ऑप्शन ऑन करा व सर्वात खाली जाऊन सेव्ह करून घ्या . आपण क्विझ तयार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकलेले आहे.


५. जो untitle form आलेला आहे त्याला नाव द्या व डिस्क्रिप्शन मध्ये कोणत्या वर्गाची , कोणत्या धड्यावर आधारित क्विझ आहे ते टाकायला विसरू नका .


६. किमान दहा प्रश्न क्विझ मध्ये असणे अनिवार्य आहे त्यासाठी प्रश्नाचे जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी मल्टिपल चॉइस ,  ड्रॉप-डाऊन , चेक बॉक्स किंवा शॉर्ट आन्सर घेतल्यास उत्तम .


७. मल्टिपल चॉइस घेतल्यास उत्तरा दाखल कमाल चार पर्याय निवडणे गरजेचे आहे .


८. प्रत्येक प्रश्नाच्या खाली आन्सर की असे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करून बरोबर उत्तर निवडायची आहे तसेच उजव्या बाजूला पॉईंट्स लिहिलेले आहे तिथे त्या प्रश्नाचे गुण द्यायचे आहेत.


९. डाव्याबाजूला आंसर फीडबॅक असे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करा ,  करेक्ट आन्सर लिहिलेले असेल ते निवडून आपला फीडबॅक आपण नोंदवू शकतो . म्हणजे विद्यार्थ्यांचे उत्तर जेव्हा बरोबर येईल तेव्हा आपण नोंदविलेला फीडबॅक त्यांना दिसेल .


१०. संपूर्ण चाचणी तयार झाल्यानंतर उजव्याबाजूला तीन टिंब दिसतील . ते मोअर सेटींग चे टिंब आहेत . त्यावर क्लिक करा , एक लिस्ट येईल त्यामध्ये ॲड वन्स वर क्लिक करावे . त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल त्यावर cerfity em असे दिसेल ते डाऊनलोड करून घ्या.


११. डाउनलोड झाल्यानंतर certify em चा लोगो सेटिंग च्या अलीकडे पहिल्या क्रमांकावर दिसेल . त्यावर क्लिक करा . जी विंडो ओपन होईल त्यामध्ये सर्टिफिकेट इज ऑफ ला अॉन करून घ्यावे . रेकॉर्ड सुद्धा येथेच दिसणार आहे . त्यानंतर किती टक्क्यावर आपण विद्यार्थ्यांची पासिंग ठरवायची आहे ते क्लिक करून तेवढ्या परसेंटेज वर ठरवून घ्यावे . त्याखाली सर्टिफिकेट कुठल्या प्रकारचे पाहिजे त्यावर क्लिक करून आपल्या आवडीचे सर्टिफिकेट निवडून घ्यावे .


१२. ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये ज्या सूचना आहेत त्या वाचून आपण नोंदवून घ्यायचे आहेत . विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट ऑनलाइन द्यायचे हे सेटिंग आहे ते सेव्ह करून घ्यावे .


१३. त्यानंतर ही क्विझ सेंड करायची आहे . त्यानंतर आलेली लिंक शॉर्ट करून कॉपी करायची आहे व व्हाट्सअप वर या भागाशी संबंधित एक पोस्ट तयार करून आपल्याला आप आपल्या गृप वर सेंड करायची असते.


१४. रिस्पाॅसेस मध्ये जाऊन आपण विद्यार्थ्यांची उत्तरे पाहू शकतो तसेच हिरव्या रंगाचे अधिकचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करून स्प्रिडशीट मध्ये सुद्धा माहिती संकलित करू शकतो.


१५. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळत असल्यामुळे त्यांचा आनंद सुद्धा द्विगुणीत व्हायला मदत होते .


©️ *ही पोस्ट माझ्या शिक्षक बांधवांना  क्विझ तयार करण्यासाठी मदत व्हावी म्हणून तयार करण्यात आलेली आहे , कृपया फॉरवर्ड करताना ही जशीच्यातशी फॉरवर्ड करावी*


*प्रशांत शेवतकर*

*_जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी केंद्रशाळा हातोला_*

9637046140


✒🌹✒

Sunday, April 26, 2020

अक्षय तृतीया.

अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे 
* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
* ब्राह्मण भोजन घालावे.
* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.
* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.
शास्त्रांमध्ये अक्षय तृतीया
* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
अक्षय तृतीयेचे माहात्म्य
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.

Friday, April 24, 2020

लोकसत्ता अग्रलेख

 लोकसत्ता मधील लेख

विचार करून डोके शिणल्यावर कुटुंबाच्या काळजीसाठी विरंगुळा म्हणून थोडे बाहेर पडले, जास्तीची खरेदी केली तर या थोडय़ा जास्तीला लगेच ‘साठेबाजी’ म्हणावे?
मध्यमवर्गाचे कूळ व मूळ काय, असले फिजूल प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही. सर्व जाती, धर्माचा समावेश असलेला हा वर्ग तसा राष्ट्रभक्त आहेच. थाळी वाजवणे, दिवे घालवणे व लावणे असल्या राष्ट्रकार्यात त्याचा सहभाग असतोच. हे काय राष्ट्रकार्य आहे का, असा प्रश्न कुणी उपस्थित केलाच तर त्याला तावातावाने उत्तर देण्यातसुद्धा हा वर्ग समोर असतो. त्यामुळे त्याच्या भक्तीविषयी शंका घेणे तसे चूकच. या वर्गाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. तो सदैव नियमांचे पालन करतो, इतरांना नियमांचे पालन करायला लावतो. जे करत नाहीत त्यांच्यामुळे अस्वस्थ होतो. तर अशा या वर्गाकडून एखादवेळ चूक घडलीच तर त्याचा किती बाऊ करायचा. याला काही धरबंद आहे की नाही! सध्याच्या टाळेबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर कापडी पिशव्या घेऊन बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी जाणारा वर्ग हाच आहे असा जावईशोध कुणीतरी लावला व नाहक या वर्गास बदनाम व्हावे लागले. हा वर्ग सध्याच्या संकटाच्या काळात एवढय़ा भाज्यांची बेगमी कशासाठी करतो? तिकडे गरिबांना अन्न मिळत नसताना स्वत:ला संवेदनशील समजणाऱ्या या वर्गाने एवढी घाऊक खरेदी करण्याची गरज काय? यांच्या घरातल्या भाज्या रोजच्या रोज संपतात तरी कशा? दर आठवडय़ाला खाद्यतेलाचे पिंप घेऊन हा वर्ग घरात नेमके काय तळतो? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करून काही कुंठित मनांनी या वर्गास बेजार करून सोडले आहे. मुळात हे असे हल्ले करणाऱ्या जमाती अनेक गोष्टींतील कार्यकारणभाव समजून घेत नाहीत. यामागचे नेमके इंगित काय तेही लक्षात घेत नाहीत.

चार्वाकाचा विवेक विचार

चार्वाकाचा विवेक विचार

मला आवडलेली Whats app post आहे.

चिंतन :*

*लेखक –डॉ.आ.ह.साळुंखे*

*५.विवेक वापरण्याचा अधिकार ही मोठी देणगी*

प्राचीन भारतात निर्माण झालेल्या दर्शनांमधे *चार्वाक दर्शनाचं* स्थान
अनेक कारणांनी आगळं-वेगळं होतं. जीवनाचा प्रवास करताना आपल्यासमोर जे
काही येतं,त्याची चिकित्सा करावी, जे आपल्या बुद्धीला, विवेकाला पटेल, ते
घ्यावं आणि बाकीचं बाजूला सरावं, या वास्तव भूमिकेवर हे दर्शन उभं होतं.
आपली ही भूमिका लोकांना पटवून देण्यासाठी हे दर्शन मानणाऱ्या एका
तत्ववेत्त्यानं केलेला एक प्रयोग मोठा लक्षणीय होता. किंबहुना, नुसता
लक्षणीयच नव्हे, तर अनुकरणीय,अनुसारणीय होता.
जुन्या परंपरेत वाढलेले लोक त्याची *चिकित्सेची भूमिका* मानायला तयार
नव्हते. स्वतः त्याची पत्नी त्याच्याशी सहमत नव्हती. अखेरीस एके दिवशी
मध्यरात्री तो आपल्या पत्नीला घेऊन गावाच्या वेशी जवळ गेला. तिथून
धुळीच्या रस्त्यावर हाताचे पंजे विशिष्ट पद्धतीनं उठवत उठवत तो गावातील
चौकापर्यंत आला. सकाळी उजाडताना पुन्हा पत्नीला घेऊन चौकात आला. त्या
रस्त्यानं जाणारे लोक धुळीतील खुणा पाहून एकमेकांत चर्चा करू लागले.
लांडग्यांच्या पावलाचे ठसे आहेत, असं म्हणू लागले. रात्रीच्या वेळी
लांडगा येतोय, अशी अफवा पंचक्रोशीतील घराघरातून पसरली. हे सगळं चार्वाक
आणि त्याची पत्नी यांच्या समोर घडलं. अखेरीस त्यांनं तिला तिला विचारलं,
“या धुळीत हे काय आहे?” ती म्हणाली, ‘हे तुमच्या हाताचे ठसे आहेत!’ तो
म्हणाला, असं कसं म्हणतेस? या पंचक्रोशीतील कुणालाही विचार. हे
लांडग्याच्या पावलाचे ठसे आहेत, असंच तुला ऐकायला मिळेल.” यावर ती
म्हणाली, “पंचक्रोशीतील काय, सर्व जगातील लोकांनी येऊन मला तसं सांगितलं,
तरी मी ते खरं मानणार नाही. कारण, हे ठसे तुम्ही आपल्या हातांनी
उठवल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.” *चार्वाक म्हणाला, याचा अर्थ लोक जे काही म्हणतात, ते तू स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहिलंस आणि जे त्या कसोटीवर टिकलं नाही, ते तू स्वीकारलं नाहीस!* इतकी वर्ष मी
तरी तुला दुसरं काय करायला सांगतोय?”
चार्वाकाचा हा प्रयोग म्हणजे तुम्हा-आम्हा भारतीयांना मिळालेला
*विवेक-प्रामाण्याचा* एक महान वारसा आहे, असं मला वाटतं. या
प्रयोगासारखाच विचार कालिदासानंही एकदा मांडला आहे. मालविकाग्निमित्र या
नाटकात तो म्हणतो,”काव्य जुनं आहे, एवढ्यावरून ते सगळं उत्तम ठरत नाही
आणि नवं आहे एवढ्यावरून निंद्यही ठरत नाही.विवेकी लोक परीक्षा करून
दोहोंपैकी एकाचा स्वीकार करतात. मूर्ख मनुष्य दुसऱ्याच्या अनुभवला
अनुसरून आपली बुद्धी चालवतो.”
*आपली बुद्धी वापरण्याचं स्वातंत्र्य, आपला विवेक वापरण्याचा अधिकार ही निसर्गानं माणसाला दिलेली मोठी देणगी आहे.* आपली बुद्धी वापरायची, याचा
अर्थ दुसऱ्याकडून काही शिकायचंच नाही किंवा इतरांना हिणवून स्वतःच्या
बुद्धीचा गैरवाजवी अहंकार बाळगायचा, असा मात्र नाही. उलट, आपली बुद्धी
नम्रपणानंच वापरायची. ती अहंकारानं डगाळून टाकायची नाही. ज्ञानामुळं
येणाऱ्या अहंकाराचं वर्णन करताना *संत तुकारामांनी म्हटलं आहे, ‘कोढियाचे गोरेपण। तैसे अहंकारी ज्ञान।’* बुद्धीचा अहंकार तर बाळगायचा नाही, पण
आपली बुद्धी दुसऱ्याकडं गहाणही टाकायची नाही, असा *सुवर्णमध्य साधणं* हे
या याबाबतीत आपलं ध्येय असलं पाहिजे.
आपली बुद्धी स्वतंत्रपणानं वापरणं, हे अनेक माणसांना अवघड वाटतं, जड
जातं, हे मात्र खरं आहे. तसं करणं त्यांना असुरक्षित पणाचं वाटतं.
त्यामुळं स्वतःच्या डोक्यावर जबाबदारीचंओझं येतं. अपयशाची, पराभवाची भीती
वाटते. त्यामुळं चाकोरीचा सुरक्षित मार्ग स्वीकारून सुखासमाधानानं जागावं
असं त्यांना वाटतं. पण अशा प्रकारचं सुखसमाधान हा आपल्या मानव्याचा अपमान
आहे, असं मानून *जे लोक स्वातंत्र्याबरोबर येणारं जबाबदारीचं ओझं पेलायला सज्ज होतात, तेच इतिहास घडवतात.समाजाला नवं वळण लावतात.मानवी संस्कृतीवर आपला ठसा उमटवतात.* समाज अशा लोकांकडं आधी संशयानं पाहतो, त्यांना विरोध
करतो,पण नंतर तो त्यांनाच अभिमानानं डोक्यावर घेऊन नाचतो कृतज्ञतेनं
त्यांच्यापुढं नम्रही होतो.

📰📓📔📒📕📗📘📙📚📖✒️